आत्महत्या -खुन
महिलेचा गळा चिरून निर्घृण पणे खुन.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी.
दिनांक- २० – ०५- २०२५
सोमवार दिंनांक- २० मे रात्री ११.३०.च्या सुमारास नवी मुंबई, उलवे येथे, एका अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरून निर्घृण खून करून, रस्त्यावर फेकून दिले आहे.
सदर महिलेचं नाव अलविन किशोर सिंग राजपुत असुन ती नवीमुंबई, उलवे सेक्टर-5 मध्ये आपल्या पती सोबत रहात होती.
कोणत्या कारणामुळे महिलेचा गळा चिरून अमानुष खुन करण्यात आला याची माहिती अजुन समोर आली नाही. मृत महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन सदर घटनेची हकिकत सांगितली आहे. आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अज्ञात आरोपी अद्याप फरार असुन. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.