
झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी
१३-०५-२०२५
आज मंगळवार दिनांक १३ मे २५ रोजी रात्री ८.३०.वाजता उलवे सिग्नल जवळ व फायर ब्रिगेड समोर धावत्या कारला आग लागली.
एम एच 12-HZ-4442 या नंबरच्या Hundai च्या i20 धावत्या कारला फायर ब्रिगेड समोर आग लागली. प्रसंगावधान राखुन कारमधील लोकांनी कार थांबवून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही.
फायर ब्रिगेड समोर असल्यामुळे लवकरच 5-10 मिनिटात फायर ब्रिगेड ने आग विझवली.
कारला आग कशामुळे लागली हे अजुन समजले नसले तरी शाॅर्ट सर्किट मुळे किंवा एसी काॅम्प्रेसर मुळे आग लागण्याची शक्यता असु शकते.