सामाजिक

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न!

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा वाढता दबदबा.

झुंजार टाईम्स 

ठाणे प्रतिनिधी : श्रावण पाटील

दिनांक:- २६-०५-२०२५

 

रविवार दिनांक २५ मे रोजी ठाणे येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पुरोगामी पत्रकार संघाची तसेच अन्याय अत्याचार निवारण समितीची संयुक्त बैठक पार पडली. ही बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब आढांगळे यांची लाभली. बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील बोलताना म्हणाले की आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे जिल्हा पिंजून काढू, चांगले चांगले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संघात आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील यांनी यावेळेस सांगितले की ठाणे जिल्हा संपर्क कार्यालय तथा संघाचे मुखपत्र शिवधर्म वृत्तपत्र याचा प्रकाशन सोहळा लवकरच घेऊ. संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांनी संघाच्या वाटचालीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी संघाची पार्श्वभूमी समजावून सांगितले पुरोगामी पत्रकार संघ म्हणजे एक विचार आहे

तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर चालणारा संघ हा महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात आपल्याला घेऊन जायचा आहे. यासाठी तुम्ही कायम माझ्यासोबत असाल अशी मला खात्री आहे

तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला,

ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील नवनियुक्त पत्रकार बंधू व अन्याय अत्याचार निवारण समितीचे पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी व बाळासाहेब आढांगळे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीत संघाच्या वाढीवर व संघ कसा एकत्र राहील त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन समितीच्या कार्याध्यक्षा प्रमिला आढांगळे यांनी केले. यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. संजय पाटील संघाचे ठाणे जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली, सहसचिव पदी नितीन खोबरे, कार्याध्यक्ष पदी शाम जोशी, संपर्कप्रमुख पदी रविंद्र साळुंखे, ठाणे शहराध्यक्ष पदी यांना सागर साळुंखे तसेच ठाणे शहर प्रतिनिधी पदी सुरेश सावकार यांची नियुक्ती करण्यात आली. अन्याय अत्याचार निवारण समितीच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी राजेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय विश्वस्त सदस्य झुंबरसिंग पाटील, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या कार्याध्यक्षा प्रमिला आढांगळे, समितीच्या राज्य उपाध्यक्षा दीपा अग्रवाल, समितीचे राज्यसचिव प्रितमसिंग चौहान, संघाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, रायगड जिल्हा सचिव राजपाल शोगोकार, संघाचे रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर, खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत, अन्याय अत्याचार निवारण समितीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास पाटील तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button