आत्महत्या -खुन
हगवणे पिता-पुत्राला पाच दिवसांची पोलीस कोठडी.

झुंजार टाईम्स
उमाजी मंडले:- पुणे प्रतिनिधी
दिनांक:- २४-०५-२०२५
हुंडयासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र आणि सुशिल हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर कोर्टाने या पिता-पुत्राला २८ मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीवेळी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर आंदोलन करत हगवणे कुटुंबाविरोधात घोषणाबाजी केली आणि दोघांवर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.