रॅली/ मोर्चा
पनवेल मध्ये भारतीय सैन्याच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १८-०५-२०२५
पनवेल मध्ये भारतीय सैन्याच्या स्मरणार्थ आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचा त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान करत नागरिक सहभागी झाले. रॅली सकाळी नऊ वाजता पनवेल मधील शिवाजी चौक, टपाल नाका वडाळा तलाव या विभागातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक,माजी सैनिक , महिला, शेकडो तरुणांनी सहभाग घेतला होता.
भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पनवेल शहर या घोषणांनी दुमदुमला व नागरिकांनी या रॅलीचे मोठ्या प्रमाणात समर्थन दाखवण्यात आले.