हार्बर रेल्वेचा संतापजनक प्रकार.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
पनवेलहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर आणि अस्वीकार्य बाब समोर आली आहे. गाडीतील डिजिटल इंडिकेटरवर “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)” या अधिकृत नावाऐवजी जुना व अपूर्ण उल्लेख “CST” दाखवला जात आहे.
ही बाब केवळ तांत्रिक चूक नसून, जाणूनबुजून मराठी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावात “महाराज” हा गौरवसंचक शब्द मुद्दाम वगळणे — हे दुर्लक्ष नव्हे, तर अपमान आहे.
रेल्वे प्रशासन अजूनही याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक तक्रारी असूनही गाड्यांच्या डिजिटल बोर्ड, संकेतस्थळे आणि तिकिटांवर चुकीचा उल्लेख कायम आहे. ही निष्काळजीपणा नक्कीच माफ करता येणार नाही.
राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तात्काळ दखल घ्यावी, तसेच सर्व ठिकाणी योग्य आणि संपूर्ण नाव — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वापरण्याचे निर्देश द्यावेत.