अपघात
इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा स्फोट.!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी.
दिनांक:- २७-०५-२०२५
सोमवार,दिंनांक-२७.मे. २५ रोजी संध्याकाळी, ७.१५.वाजता एरटीगा या ओला कारचा आग लागुन, सी. एन.जी. चा स्फोट झाला आहे.
माहुल जवळ,पनवेल मार्गावर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर संध्याकाळी.७.१५.सुमारास इरटीगा ह्या प्रवासी (ओला.) कारला आग लागुन, सी.एन.जी.ने पेट घेउन सिलिंडर फुटून स्फोट झाला आहे.
फायर ब्रिगेड येण्यापूर्वीच व पोलीस सुद्धा उपस्थित असताना दोन-तीन मिनिटात गाडीने पेट घेउन,गाडीचा स्फोट झाला असुन,कार पूर्ण पणे जळाली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती आहे.
नेमकी आग कशामुळे लागली? ह्याचे कारण अजुन अस्पष्ट नाही. नुकतेच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास करीत आहेत.