आर्थिक घडामोडी
ऑनलाईन प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ!

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २४-०५-२०२५
हाल्ली प्रत्येक कामासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाते. म्हणूनच राज्य सरकारने सेतूवर मिळणाऱ्या ऑनलाईन प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ केली आहे. कागदपत्रांची घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ही दरवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. आता शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशाला सुरुवात झालेली असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना शासकीय प्रमाणपत्र ऑनलाईन रित्या प्राप्त करण्यास अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. शासनाने शासन निर्णय काढून सेवाशुल्क दुप्पट केले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.