कुर्ला स्टेशनवर रेल्वे ट्रॅक वरील घनकचरा काढण्यास सुरुवात.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २२-०५-२०२५
सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मान्सून पुर्व कामे बाकी आहेत मागील वर्षापेक्षा यावर्षी पाऊस लवकरच चालू होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे त्यातच अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. याचा अंदाज घेऊन रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने रेल्वेच्या कामाचे तीन तेरा केले आहेत. काही ठिकाणी तर नालेसफाई नसल्याने रेल्वे ट्रॅक वर पाणी आले होते.
कुर्ला येथील रेल्वे ट्रॅक मधील नाले साफसफाई करण्यास चालू केले आहे रेल्वे रेल्वे प्रशासनाने ट्रॅक वर पाणी साचू नये यासाठी पावसाच्या अगोदर या सर्व उपाययोजना चालू केल्या आहेत तर काही ठिकाणी पंपाची ही दुरुस्ती करून सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात रेल्वे, ट्रॅकवरून व्यवस्थित चालावी याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.