मालेगांव शितल अकॅडमी इंग्लिश स्पिकिंग ई प्रवक्ता अकॅडमी नामकरण सोहळा.

झुंजार टाईम्स
अनिकेत सुर्यवंशी:- मालेगाव प्रतिनिधी
दिनांक:- १३-०५०२०२५
शितल अकॅडमी आता प्रवक्ता अकॅडमी या नावाने नवीन रूपात आपल्याला पाहायला मिळेल दिनांक. १२-०५-२०२५ रोजी मालेगाव येथे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादा भुसे व प्रा. रवींद्र पाटील फाउंडर प्रवक्ता अकॅडमी भारत व नेपाळ, अरुण सैंदाणे संचालक प्रवक्ता अकॅडमी मालेगांव तसेच इतर मान्यावरांच्या उपस्थितीने हा सोहळा पार पडला या सोहळा प्रसंगी रवींद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आजच्या २१ व्या शतकात आजची भविष्यवेधी शिक्षण जर विद्यार्थ्यांना द्यायचे असेल तर आधुनिक पद्धतीने टेक्नॉलॉजी बेस द्यावे लागेल तर त्याच बेस वरती प्रवक्ता अकॅडमीची निर्मिती केली गेली आहे AI द्वारा इंग्लिश स्पीकिंग शिकवणारी ही एकमेव संस्था नावावर रूपाला प्रवक्ता अकॅडमी आहे भुसे साहेबांनी प्रवक्ता अकॅडमी ला शुभेच्छा दिल्या अशाच पद्धतीने तुमचं काम पुढे होत राहू व विद्यार्थ्यांना तुम्ही सगळ्यात उत्तम अशी इंग्लिश स्पिकिंग शिकवावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. भारत भाऊ जगताप (जिल्हा अध्यक्ष आर पी आय ) , उपक्रम शिल शिक्षक भिमराव मगरे, आर पी आय चे जेष्ट नेते दादाजी महाले, दिलीप शेजवळ, शांतराम सोनवणे, सुदेश वाघ, किरण खरे, बहुसंख्य शिक्षण प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम चे सुत्र संचालन महेश अहिरे व आभार प्रदर्शन अरुण सैंदाणे यांनी केले.