कोन ग्रुप ग्रामपंचायत मधील सरपंचासह सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ११ मे २०२५
गेल्या ८ महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या ग्रुप ग्रामपंचतात मधील शेकापच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.बऱ्याच वर्षांपासून शेकापचे काम करणारे कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत कोन सदस्यांनी ग्रामपंचायतीचा मोट्या प्रमाणात विकास व्हावा व जनतेचे प्रश्न सुटावे , अजून आम्ही जोमाने काम करावे यासाठी आम्ही प्रयत्न शील राहू यासाठी प्रवेश केला आहे असे अक्षय घरत यांनी सांगितले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत कोन येथून शेकाप मधून भाजप मध्ये सरपंच अश्विनी शिसवे,सदस्य अक्षय घरत, सदस्य साहिल म्हात्रे, माजी सरपंच निलेश म्हात्रे, माझ माजी सरपंच शंभो शिसवे, माजी उपसरपंच अशोक म्हात्रे , नितीन म्हात्रे रवी शेळके उद्योजक बाबुराव मात्रे माजी सदस्य संतोष घरत युवा नेते दीपक म्हात्रे, नितीन म्हात्रे रवी शेळके राहुल घरत किशोर शिसवे या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे