जम्मू सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात BSF चा जवान शहीद, सात जवान जखमी.
जम्मू काश्मीर आतंकवादी कारवाया.

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक ११ मे २०२५
जम्मू : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या आर. एस. पुरा सेक्टरमध्ये शनिवारी (१० मे २०२५) पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान शहीद झाला असून, सात जवान जखमी झाले आहेत.
शहीद झालेल्या जवानाचे नाव मोहम्मद इम्तियाज असून ते बिहारमधील छपरा येथील रहिवासी होते. गोळीबार सुरू असतानाच इम्तियाज यांनी पुढे जाऊन धाडसाने नेतृत्व करत सर्वोच्च बलिदान दिले, अशी माहिती BSF च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन
शनिवारी झालेला हा गोळीबार पुन्हा एकदा पाकिस्तानकडून केलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन मानलं जात आहे. भारतीय जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर दिलं. घटनास्थळी तणावाचं वातावरण असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
जखमी झालेल्या सात जवानांवर जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जवानांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे.