दहशतवादी कारवाया

पाकिस्तानी गोळीबारात आयुक्त थापांचा मृत्यू.

पाकिस्तानचा भ्याड हल्ला.

झुंजार टाईम्स

उमाजी मंडले:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक १० मे २०२५

पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही माहिती देत थापांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हा दौऱ्यावर होते. शुक्रवारी पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतातील 26 शहरांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. जम्मू, काश्मीर, गुजरात, राजस्थान व पंजाबमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button