जसखार गावच्या श्री रत्नेश्वरी देवीचा पालखी सोहळा!

झुंजार टाईम्स
कांतीलाल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
२४-०४-२०२५
उरण तालुक्यातील ग्रामदेवताच्या जत्रांना उत्साहात सुरुवात झाली आहे. आपल्या कुटुंबाला सुख समाधान लाभावे, या इच्छेने गावा गावातील लोक आपल्या ग्रामदेवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी करत आहेत .
रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली व नवसाला पावणारी हजारो लोकांच्या श्रद्धास्थान असणारी जसखार गावची सुप्रसिद्ध श्री रत्नेश्वरी देवीची यात्रा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सोमवार दिनांक २१-०४-२५ रोजी श्री रत्नेश्वरी ची यात्रा संपन्न झाली. आणि मंगलवार दिनांक २२-०४-२५ रोजी पालखी मोठ्या थाटामाटात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी जसखार गावचे ग्रामस्थ व उरण पनवेल तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवसाला पावणारी व भावीक भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवीची ख्याती सर्वत्र आहे.