आत्महत्या -खुन

सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या: वैद्यकीय वर्तुळात खळबळ.

या फॅमिली कडे स्वताचे तीन प्रायव्हेट चार्टर्ड विमाने आहेत... कित्येक शे कोटींची मालमत्ता आहे... पण मनाचं स्वास्थ्य कुठाय...?

झुंजार टाईम्स 

महेंद्र सांगाडे:- सोलापूर प्रतिनिधी 

राज्यभरातील हजारो रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले आणि मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांत पारंगत असलेले सोलापूरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आज स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रचंड संपत्ती, समाजात प्रतिष्ठा आणि वैद्यकीय क्षेत्रात बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाणारे डॉ. वळसंगकर यांची ही आत्महत्या सर्वांनाच हादरवून टाकणारी ठरली आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

डॉ. वळसंगकर यांच्या नावावर राज्यातील अनेक रुग्णालयांतून रुग्ण पाठवले जात असत. त्यांच्याकडे ऑपरेशनसाठी महिने महिने प्रतीक्षा यादीत रुग्ण राहात असत. वैद्यकीय सेवेमुळे त्यांना “सोलापूरचे भूषण” असेही संबोधले जात होते.

आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉक्टर वळसंगकर हे आपल्या शांत, संयमी स्वभावामुळे ओळखले जात होते.

ही आत्महत्या केवळ एका डॉक्टरची नाही, तर समाजातील मानसिक तणावाच्या वाढत्या समस्येवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना ठरत आहे. संपर्कात राहा, बोलत राहा – मानसिक आरोग्य हीसुद्धा जबाबदारीच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button