भक्ती श्रध्दा
गोकुळमधील रामभक्तांनी रामनवमी केली जल्लोषात साजरी!

झुंजार टाईम्स
अमोल पाटील :- पनवेल प्रतिनिधी
आजीवली ता.पनवेल येथे रविवारी सकाळी रामनवमीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी काकड आरती ५.३० सुरुवात झाली त्यावेळेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. त्यानंतर सत्यनारायण पूजा ८.३० वाजता संपन्न झाली. त्याचबरोबर दुपारी १२.०० वाजता प्रभू श्री रामाचा पाळणा म्हटला व फुले टाकून स्वागत केले.
सायंकाळी लहान मुलांनी वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर प्रभू श्री रामाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.’ प्रभू श्री राम की जय’ या जयघोषाने गोकुळ नगरी दूम-दूमली. सायंकाळी महाप्रसादाचे नियोजन केले होते. सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमावेळी श्री वास्तुरचना क्रीयेटरचे राजाराम निकम, लक्ष्मण निकम, आनंदराव कचरे व गोकुलमधील सर्व रामभक्त उपस्थित होते.