कॅनरा बँकेच्या सहकार्याने आदिवासी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप.

झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- पनवेल प्रतिनिधी
कॅनरा बँकेने आपली सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी विद्यार्थिनींसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला.दि.७ एप्रिल २०२५ रोजी पनवेलजवळील पोयंजे येथील माध्यमिक विद्या मंदिरामध्ये पंधरा गरजू आदिवासी विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात कॅनरा बँकेचे प्रादेशिक प्रमुख दिपक सक्सेना यांच्या हस्ते सायकली वितरित करण्यात आल्या.यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकत होते.
या कार्यक्रमास कॅनरा बँक पनवेल शाखा प्रमुख बालमुकुंद कुमार, प्रादेशिक मार्केटिंग प्रमुख नवी मुंबई ओंकार कोळेकर, कळंबोली शाखा प्रमुख सुरज भंडारे, शाळेचे मुख्याध्यापक लकचंद ठाकरे, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवधर्म वृत्तपत्राचे मुख्य संपादक व संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, जिल्हा सचिव राजपाल शेगोकार हेही प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून भिनंदन करण्यात येत असून, बँकेचे उपमहाव्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय नवी मुंबई व संचालक मंडळाच्या वतीने यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
सायकल प्राप्त झालेल्या विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे: १.अनन्या प्रशांत दगडे(खानावळे) २.केतकी जगदिश मांडे(तळेगाव) ३.मेघना विजय मांडे(तळेगाव वाडी) ४.निकिता जाबालाल शेख(तळेगाव वाडी) ५.नयना संतोष वाघमारे(पिला बुद्रुक) ६.वेदिका केशव दिसले(खानावळे) ७.वेदिका यशवंत पवार(मोहोपे) ८.कीर्ती गुरूनाथ मांडे(खानावळे) ९.पायल जगन्नाथ थोम्बरे(खानावळे) १०.संस्कृती नंदकुमार चौहान(तळेगाव वाडी) ११.तृषा जयंत पवार(मोहोपे) १२.आरुषी मनिषकुमार पांडे(भिंगारवाडी) १३.शबरिन बरकततुला शेख(भिंगारवाडी) १४.स्वप्न प्रकाश कातकरी(पोयंजे वाडी) १५.प्रियंका प्रकाश चौहान(तळेगाव वाडी)
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवासात नवा उत्साह व ऊर्जा लाभेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.