
झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- महेंद्र माघाडे.
शनिवार २६.एप्रील.२०२५.रोजी दु.१०.वा.बाल लैंगिक शोषण विरोधात शाॅर्ट फिल्म दाखवत,मुलांची सुरक्षिततेचं प्रशिक्षण देत लहान मुलं व शाळेतील मुलंमुली यांच्या बद्दल लैंगिक शोषण विरोधात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेतील बस कर्मचारी, केअरटेकर, क्लिनर, बस सुपरवायझर, शाळेतील शिक्षक, शाळा कर्मचारी ई.उपस्थित होते.
लैंगिक शोषण विरुद्ध पोक्सो कायदा आणि २०१९ नंतर त्यातील दुरुस्ती यांविषयी माहिती देण्यात आली.मुलीनी(अल्पवयीन) आपली सुरक्षा कशी करावी,नको असलेला स्पर्श कसा ओळखावा,आपल्या विश्वासु माणसांला म्हणजे आई,शिक्षिका,बहिण,वडिल यांना कसे सांगावे.शरीराच्या चार गुप्तांगाची रक्षा कशी करावी.त्यास स्पर्श करणा-यास विरोध कसा करावा.त्याची माहिती आपल्या विश्वासु माणसांस किंवा 📞1098.ह्या चाईल्ड हेल्प लाईन ला कशी द्यावी ह्याची माहिती देण्यात आली.
एकुण काय तर लहान मुलांची सुरक्षितता व लैंगिक शोषण पासुन मुलांचे रक्षण करण्यास सांगण्यात आले.अतिशय छान व महत्वपूर्ण उपक्रम राबवत शाळेने बाल लैंगिक शोषण विरुद्ध आपली लढाई चालु ठेवली आहे.