सण उत्सव

भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी भीम जयंती पंचशील नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी!

झु़ंजार टाईम्स 

गणेश पराग:- पनवेल प्रतिनिधी 

भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी भीम जयंती महोत्सव बहुजन विकास सामाजिक संस्था आणि रविभाऊ रत्नपारखे फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३,१४,१५ रोजी मोठ्या उत्साहात पंचशील नगर सेक्टर १७ नवीन पनवेल येथे साजरी करण्यात आली.

यावेळी बहुजन विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रतन हरिभाऊ नेमाडे, उपाध्यक्षा कांताबाई वानखेडे, सचिव गणेश रामचंद्र पराड व खजिनदार सुरेश तिरकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच रविभाऊ रत्नपारखे फ्रेंड सर्कलचे संस्थापक रविभाऊ राजू रत्नपारखे व अध्यक्ष मंगेश पराड यांनी पण पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात केली.

बहुजन विकास सामाजिक संस्थेमार्फत मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये

१. राजपाल शेगोकार यांचा समाज रत्न व ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

२. रजनी राजेश घरत यांचा उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

३. युवा संस्था पनवेल खारघर यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

४. तेजस्वी विजय इंगोले उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

५. समा मुन्ना शेख उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

बहुजन विकास सामाजिक संस्थे मार्फत स्नेहभोजन कार्यक्रम करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला विशेष सहकार्य सुरेश रामचंद्र पराड आणि कांताबाई अर्जुन वानखेडे यांचा लाभले, तसेच बहुजन विकास सामाजिक संस्थे मार्फत लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले व लहान मुलांना संस्थे मार्फत पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून

लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रशांतदादा ठाकूर आमदार पनवेल विधानसभा, ॲड.प्रकाश बिणेदार नगरसेवक पनवेल महानगर पालिका, विक्रांतदादा पाटील, आमदार विधानपरिषद महाराष्ट्र, ऍड. मनोज भुजबळ मा. नगरसेवक पनवेल महानगर पालिका, संदिप पाटील मा नगरअध्यक्ष पनवेल नगरपालिका, सुशीला घरत मा. नगरसेविका पनवेल नगरपालिका, अमित जाधव रायगड जिल्हा परिषद सदस्य, जगदीश घरत, रविनाईक वंदे मातरम् रिक्षा टॅक्सी संघटना अध्यक्ष, तेजस कांडपिळे मा.नगरसेवक पनवेल महानगर पालिका,राहुलभाऊ बोर्डे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील प्रतिष्ठान, राजपाल शेगोकार पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा सचिव, उमाजी मंडले रायगड जिल्हा संघटक आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button