बौद्ध वस्तीतील शौचालय रहस्यमय रित्या गायब!
समाजमंदिर लगत बौद्ध वस्तीतील शासकीय योजनेअंतर्गत बांधली गेलेली शौचालये अतिक्रमन करुन भुईसपाट.व स्मशानभूमीवर सुद्धा अतिक्रमण.

झुंजार टाईम्स
भालचंद्र गायकवाड:- कर्जत तालुका प्रतिनिधी
माणगाव तर्फे वरेडी, ता.कर्जत जि.रायगड येथील समाज मंदिर लगत बौद्ध वस्तीत शासकीय योजनेअंतर्गत ” शौचालये ” बांधण्यात आले होती. दिनांक ६/४/२०२५ पर्यंत ” शौचालये ” तिथे अस्तित्वात होती. परंतु दिनांक ७/४/२०२५ रोजी सकाळी तेथील बौद्ध वस्तीतील ग्रामस्थ रमाकांत सोनावणे आणी इतर ग्रामस्थ मंदिराकडे साफसफाई करण्यासाठी गेले असता, “शौचालये” भुईसपाट झालेली दिसली. तसेच बौद्ध वस्तीसाठी वापरात येणरी स्मशानभूमी जिथे आहे. त्या जागेवर देखील अतिक्रमण झालेले दिसुन आले. आणी ज्या लोखंडी बारवर शव ठेऊन अग्नी देण्यात येते ते लोखंडी बार तीन पैकी दोन गायब झाले आहेत, असे निदर्शनास आल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येऊन सदर घटनेची माहीती लेखी आर्जाद्वारे १)मा. ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत माणगाव २) मा.गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत ३) मा.कार्यकारी अधिकारी, अलिबाग रायगड ४) मा.तहसीलदार, कर्जत रायगड ५) मा. उपविभागीय अधिकारी ( प्रांत ) ६) मा.पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे कर्जत रायगड ७) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत रायगड यांस सदर घटनेची चौकशी करणेसाठी विनंती अर्ज सादर करण्यात आला.
सदर अतिक्रमणाचा लवकरांत लवकर दखल घेऊन चौकशी करण्यात यावी व बौद्ध ग्रामस्थांना न्याय मिळवुन द्यावा. नाहीतर समाजातर्फे आंदोलन उभे केले जाईल.असा इशारा बौध्द ग्रामस्थांकडून देण्यात आला होता. परंतु आज बुधवार दिनांक १६ एप्रील २०२५पर्यंत सदर घटनेची दखल न घेतल्यामुळे नेरळ पोलीस ठाण्यात ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत माणगाव तर्क वरेडी आणी गटविकास अधिकारी, कर्जत. यांच्या विरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचे,रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशजीश गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख मंगेशजी सावंत, खालापूर तालुका अध्यक्ष विलास कांबळे, पनवेल तालुका युवा अध्यक्ष इंद्रा कांबळे, पनवेल तालुका कार्याध्यक्ष रुषिकेश गायकवाड, सुधागड पाली तालुका सचिव निलेश गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष मारुती जाधव, कर्जत तालुका कार्याध्यक्ष व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कर्जत तालुका अध्यक्ष भालचंद्र बळीराम गायकवाड, कर्जत तालुका सचिव/ग्रामस्थ रमाकांत सोनावणे, ग्रामस्थ मुकेश गायकवाड, संतोष सोनावणे व इतर ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेवक आणी गटविकास आधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे अतिक्रमणाची दखल न घेतल्यामुळे, दगडावर लाकडे रचून अंत्यसंस्कार करण्यात आले.हि अतिशय लाजिरवाणी घटना..! फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यात घडली आहे.
महाराष्ट्र सरकार ने लवकरात लवकर लक्ष घालून ह्या घटनेची दखल घेऊन बौद्ध वस्तीत अतिक्रमण करणा-या गावकरी लोकांवर कारवाई करावी.हि अपेक्षा माणगाव तर्क वरेडी चे बौद्ध वस्तीतील बौद्ध बांधव करत आहे.