दहशतवादी कारवाया
पहलगाम हल्ल्याच्या कटाचा मास्टरमाईंडचा शोध!
अख्या जगाला हादरून टाकणारा पहलगाम हल्ला.

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
पहलगाम – काश्मीर २६-०४-२०२५
पहलगाम हल्ल्यामागे आयएसआय चा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत. लष्कर ए तोयाबाचा उपप्रमुख सैफुल्लाच्या नेतृत्वात हा कट रचला गेला.
सैफुलाच्या नेतृत्वात पाच अतिरेकीचे प्लॅनिंग करण्यात आले. फेब्रुवारी २०२५ मध्ये सैफुल्लाने कट रचण्याचे आदेश दिले, मार्च २०२५ या महिन्यात पाकिस्तानच्या मिरपूर मध्ये सर्व हल्लेखोर दहशतवादी एकत्र आले पाकिस्तानच्या मीरपूरमध्ये पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग झाले होते.
१८ एप्रिल २०२५ मध्ये पाक व्याप्त काश्मीरच्या रावलकोट मध्ये सैफुलाच्या कार्यक्रम झाला. सैफुलाच्या कार्यक्रमात पाचही अतिरेकी उपस्थित होते. सैफुल्लाने चिथावणीखोर भाषण दिले होते.