पनवेल महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निबंध व वत्कृत्व स्पर्धा आयोजन!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- कळंबोली प्रतिनिधी
‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती’ निमित्ताने सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयामध्ये शालेय स्तरावर दिनांक २६ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत निबंध, वक्तृत्व स्पर्धाचे दिलेल्या गटात व विषयानुसार आयोजन करावे व या स्पर्धेतील प्रथम ३ क्रमांक (प्रत्येक गटातील) यांची नावे दिनांक ०२ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत मनपा शिक्षण विभाग (लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय शाळा क्र.१, दांडेकर हॉस्पिटल समोर, पनवेल) कार्यालयात सादर करावीत असे महापालिकेच्यवतीने सूचित करण्यात आले आहे.
माननीय आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धा शालेय दोन गट व खुला गट अशा तीन गटात घेतल्या जाणार आहेत. तिन्ही गटांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांसाठी विविध विषय देण्यात आले आहे. शाळा स्तरावर प्रथम येणाऱ्या तीन क्रमाकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. तसेच मनपा स्तरावर प्रथम येणाऱ्या तीन क्रमाकांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सोमवार दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन मान.आयुक्त तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या स्पर्धा लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय शाळा क्र.१, दांडेकर हॉस्पिटल समोर, पनवेल येथे सकाळी ०९:०० वाजता घेतल्या जाणार आहेत.या स्पर्धा तीन गटात घेतले जाणार आहे, तीनही गटांसाठी मराठी, इंग्रजी माध्यमातून स्पर्धा घेण्यात येतील. तिन्ही गटांसाठी विषय पुढे दिल्याप्रमाणेच राहतील.
निबंध व वकृत्व स्पर्धेसाठी शाळा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका लोकनेते दि.बा.पाटील विद्यालय मनपा शाळा क्र.१ मधील मुख्याध्यापक केंद्र प्रमुख वाल्मीक राठोड यांच्याकडे ०२ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत प्रथम तीन क्रमांकाची नावे द्यावीत या स्पर्धेचा निकाल दिनांक१४ एप्रिल २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर घोषित करण्यात येईल
निबंध स्पर्धा
अ) ५ ते ७ शालेय गट- निबंध स्पर्धा शब्द मर्यादा 200 शब्द
विषय
१)संविधानाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) माझी माय रमाई
३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण
ब)8 ते 12 शालेय गट- निबंध स्पर्धा शब्द मर्यादा 400 शब्द
विषय
१) स्त्री मुक्तीसाठी डॉ.बाबासाहेबांचे आंबेडकर
योगदान
२) मला भावलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर
३) शिक्षण तज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क)खुला गट- निबंध स्पर्धा शब्द मर्यादा 500 शब्द
विषय
१) नवीन उद्योजकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रेरणा स्थान’
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म–सर्व समस्यांचे निराकरण’
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील योगदान
वक्तृत्व स्पर्धा
अ) ५ ते ७(शालेय गट)- वक्तृत्व स्पर्धा वेळ ३ मिनिटे
विषय
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य
२) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य
३) संविधानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
ब)8 ते 12 शालेय गट – वक्तृत्व स्पर्धा वेळ 5 मिनिटे
विषय
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यता निर्मूलन कार्य
२)संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर
३) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण प्रवास
क) खुला गट – वकृत्व स्पर्धा वेळ 7 मिनिटे
विषय
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता
२)राष्ट्र निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक सामाजिक चळवळ
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
1. श्री.अशफाक काझी (केंद्र समन्वयक) 7045880679
2.श्री.वाल्मिक राठोड (केंद्र प्रमुख) 8097568928
3.श्री.वैभव सि.पाटील(केंद्र प्रमुख) 8983560710
स्पर्धेसाठी नियम व अटी लागू
१) स्पर्धेसाठी दिनांक ०७/०४/२०२५ रोजी वेळ सकाळी ०9:०० अशी राहील.
२) निबंध यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेला नसावा.
३) एका व्यक्तीस वरील गटानुसार एकाच विषयावर एकच निबंध लिहिण्याची अनुमती असेल.
४) सदर निबंधात वैध संदर्भ असणे अनिवार्य राहील.
५) एका व्यक्तीस वरील गटानुसार एकाच विषयावर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची अनुमती असेल.
६) निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेचा निकाल दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी जाहीर केला जाईल.
७) निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेच्या निकालाबाबतचे पूर्ण अधिकार आयोजकांकडे राखीव राहतील.