नवी मुंबई, कळंबोली शहरात गुढीपाडवा आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत!
तपतपत्या उन्हातही उपस्थिति वाखाखण्या सारखी होती. शेकडो महिला पुरूष यांनी भगवे ऐटदार परिधान केलेल्या फेट्यानी शहर झाले भगवेमय.

झुंजार टाईम्स
उमाजी मंडले:- कळंबोली प्रतिनिधी
नवी मुंबई_दि. ३० रविवार
नवी मुंबई, कळंबोली येथील गुढीपाडवा सांस्कृतीक आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने या वर्षीही शहरात गुढीपाडवा
आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या वर्षीही संस्थेच्या वतीने गुढीपाडवा
आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज संपूर्ण शहर नववर्षाच्या स्वागतासाठी सजले होते.आज संपूर्ण शहरात रांगोळ्या, आकर्षक गुढ्या उभारुन नविन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. आज सकाळी नऊ पासूनच कडक ऊन असून सुद्धा कार्यक्रमात उत्साह आणि सहभाग अतोनात दिसून आला
या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सायंकाळ पासूनच झाली होती. रांगोळी स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा चिमुकल्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आणि वाहा!वाहा,,!! मिळवली.
आज सकाळी आठ वाजता कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी परंपरेनुसार गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली. त्यानंतर ढोलताशाच्या गजरात संपूर्ण शहरात भव्य शोभायात्रा विविधतेने नटलेले देखावे, रथयात्रेसह, मिरवणूक निघाली. शोभायात्रेत शेकडो महिला पुरूष, अबाल वृद्धांनसह पारंपरिक पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्रीराम प्रभू आणि शिवाजीराजांचे भव्य दिव्य पुतळ्यानी सजलेले सुंदर रथ हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. पारंपरिक भारुड, गोंधळ, भजन, पोतराज अशा विविध प्रकारच्या सादरीकरणासाठी अनेक सजलेल्या गाडीतून सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत वाढवली. ज्ञानमंदिर शाळेतल्या चिमुकल्या मुलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून लेझिम पथकाचि सुंदर चाल आणि लयबध्द ताल यानी नागरिकांना चांगलेच आकर्षित केले .
या कार्यक्रमात हिंदू जागृती समिती, सनातन संस्था, धार्मिक, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन एकतेचा संदेश दिला.
आज संपूर्ण शहरात रांगोळ्या, आकर्षक गुढ्या उभारुन नविन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. शेकडो महिला पुरूष यांनी भगवे ऐटदार परिधान केलेल्या फेट्यानी शहर भगवेमय झाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनेक जाती धर्मातील, विविध पंथातील नागरिकांनी, व्यापारी वर्ग, मजुर, गरीब, श्रीमंत. अबाल पासून वृद्ध सर्वांनी उत्साहात भाग घेतला. आमदार विक्रांत पाटील यांनी या कार्यक्रमास आवर्जुन भेट दिली. शोभा यात्रेत बाळाराम पाटील,बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळे, कृष्णा कदम,बबन मुकादम ,अमर पाटील रवी पाटील रवी भगत गोपाळ भगत अशा अनेक मान्यवरांनी यांनी आवर्जून भाग घेतला
कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी मान्यवरांचा सन्मान अध्यक्ष शहाजी धुमाळ, सचिव उध्दव कदम, खजिनदार ,विजय सावंत, सदस्य शरद वाडीकर, संजय भोंडवे आदींनी केला. बांधकाम व्यवसायिक राहुल हजारे आणि व्यावसायिक रमेश राव, रमेश नायर यांनी या कार्यक्रमास विशेष साह्य केले. त्याबद्दल त्यांचें विशेष आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक प्रदिप फडतरे, अध्यक्ष शहाजी धुमाळ, सचिव उध्दव खजिनदार ,विजय सावंत सदस्य , शरद वाडीकर, संजय भोंडवे,
केशव पडवळ , माणिकराव पवार तसेच दत्ता गडाख,मोहन बलखंडे, देविदास खेडकर, मोरेश्वर चौधरी, मयूर गारेड,, सचिन मोरे, महेश जाधव ,बाळासाहेब जगताप, रघुनाथ झुनगरे, अशा अनेक संस्थेच्या सभासदांनी , तरुण पिढी, महिलांनी भरपूर श्रम घेतले संस्थेचे सचिव उध्दव कदम यांनी सर्वांचे आभार मानले.